Jasprit Bumrah: ज्याची भीती होती तेच घडलं, सलग दुसऱ्यांदा जसप्रीत बुमराहला सर्वात मोठा फटका
ICC Test Ranking Update: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका रंगली जी भारतीय संघाने जिंकली. आता यानंतर भारतीय संघासाठी एक बातमी आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सध्या जगभरात कसोटी क्रिकेट खेळले जात असून, कसोटी क्रमवारीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत.
भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळला. या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा विजय झाला असला तरीही कसोटी क्रमावरीत त्याचे फार चांगले पडसाद उमटलेले दिसत नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तीन डावांमध्ये केवळ ७४ धावा करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत गिल दोन स्थानांनी घसरून आता नवव्या स्थानावर आला आहे. सातव्या क्रमांकावर असलेला ऋषभ पंत भारताचा अव्वल कसोटी फलंदाज कायम आहे.
बुमराह सलग दुसऱ्या आठवड्यात एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. मॅट हेन्री एका स्थानाने वर चढून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बुमराह भारतीय संघाच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर होता आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे त्याला आपल्या क्रमवारीत फटका बसला आहे.
भारताकडून दुसरी कसोटी हिसकावून घेणाऱ्या सोनल दिनुशाने कसोटी फलंदाजी क्रमवारीत २९ स्थानांची झेप घेतली आहे. दिनुशाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार डावांमध्ये १४० च्या प्रभावी सरासरीने ४२० धावा केल्या.