पोटाची चरबी कमी करण्यासाठी ट्राय करा ही पेय

| Updated on: Dec 17, 2022 | 12:56 PM

1 / 5
वजन कमी करणे हे काही खायचं काम नाहीये. त्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. वाढलेल्या वजनामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक तक्रारी उद्भवू शकतात. पोटाची चरबी आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अनेक हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता.

2 / 5
जिऱ्याचे पाणी - वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणीही पिऊ शकता. त्यासाठी एक चमचा जिर थोड्या पाण्यात घालून ते चांगले उकळावे. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

3 / 5
ग्रीन टी- ग्रीन टीचे नियमितपणे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते. ग्रीन टीमुळे पचनसंस्था स्वस्थ राहते. तसेच मेटाबॉलिज्म वेगाने होण्यास मदत होते. यामुळे पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते.

4 / 5
ओव्याचे पाणी - शरीरासाठी ओव्याचे पाणी खूप फायदेशीर ठरते. रात्रभर पाण्यात ओवा भिजवून ठेवा. सकाळी ओवा घातलेले पाणी गरम करून ते प्यावे. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

5 / 5
दालचिनीचे पाणी - एक ग्लास पाण्यामध्ये दालचिनीचे तुकडे घालून ते पाणी 5 मिनिटांपर्यंत उकळावे. त्यानंतर पाणी गार करावे आणि त्याचे सेवन करावे. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळेल.