ज्याची भीती तोच हवामान विभागाकडून इशारा, राज्यात ऑक्टोबर महिन्यातच..
भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. त्यातच ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. ज्याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला. त्यातच हवामान विभागानेही इशारा दिला.

राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागात पाऊस झाला. यासोबतच आता केल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
त्यातच राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकमध्ये 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढउतार बघायला मिळत आहे.
ऑक्टोबर महिन्यातच अनेक शहरांमध्ये पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली. सोलापूरात 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात पुढील काही दिवसात तापमान अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तसा इशारा हवामान विभागाने दिला. सातारा, रत्नागिरी, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा इशारा दिला.
राज्यात उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. त्यातच पुढील काही दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस कठीण असणार आहेत.