Bike Fuel Saving Tips : पेट्रोलची मारामार असताना बाइक पळवताना पेट्रोल कसं वाचवायचं, त्याच्या सोप्या ट्रिक्स
Bike Fuel Saving Tips : मध्य पूर्वेतील युद्धामुळे सध्या तेल संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल आऊट ऑफ स्टॉक होत आहे. या स्थितीत बाइकमधील पेट्रोल कसं वाचावायचं? त्याच्या सोप्या टिप्स.

भारतात अजून तरी पेट्रोलचे दर स्थिर आहेत. पण काही ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला आहे. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रागा दिसत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल जास्तीत जास्त वाचवणं गरजेच आहे. आज आम्ही तुम्हाला बाईकचा मायलेज वाढवणाऱ्या आणि पेट्रोल बचतीच्या काही टिप्स देणार आहोत.

बाइक चालवताना वारंवार क्लच दाबू नका. अनेकदा लोक हाफ क्लच दाबून बाइक चालवतात. त्यामुळे मायलेजवर परिणाम होतो. त्याशिवाय इंजिनची नुकसान होतं. क्लच टाईट होत असेल, तर लवकर दुरुस्त करा.

बाइक तुम्ही जोरात चालवता तेव्हा गिअरचा वापर करु नका. कारण त्याचा इंजिनवर परिणाम होतो. पेट्रोल जास्त प्रमाणात लागतं. बाइक चालवताना तुम्हाला 30 सेकंदापेक्षा जास्तवेळ थांबावं लागत असेल, तर इंजिन बंद करा. त्यामुळे बाइक इंजिनची लाइफही वाढेल आणि पेट्रोलही वाचेल.

बाइक तुम्ही उन्हात पार्क करत असाल, तर त्यामुळे सुद्धा पेट्रोल जास्त लागतं. उन्हात बाइक उभी केल्यामुळे पेट्रोल हवेत उडून जातं. म्हणून बाइक नेहमी सावलीत पार्क करा.

बाइकमधल्या टायरचा एअर प्रेशर कधी कमी होऊ देऊ नका. कारण हवा कमी झाल्यास थेट परिणाम इंजिनवर होतो. एअर प्रेशर असल्यास बाइक सहज चालते तसच मायलेज सुद्धा वाढतो.