या देशांमध्ये लोक झाडं पाहण्यासाठी तरसतात, झाडांची संख्या खूपच कमी

जगातील असे काही देश आहेत, ज्या ठिकाणी झाडांचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे तेथील लोक झाडे बघण्यासाठी तरसतात. कोणते आहेत ते देश? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Oct 23, 2026 | 9:48 PM
1 / 5
जगभरात पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि हरितीकरणाच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. मात्र, जगात असेही काही देश आणि प्रदेश आहेत, जिथे नैसर्गिकरीत्या झाडं आणि हिरवळ अत्यंत कमी प्रमाणात आढळते.

जगभरात पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि हरितीकरणाच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. मात्र, जगात असेही काही देश आणि प्रदेश आहेत, जिथे नैसर्गिकरीत्या झाडं आणि हिरवळ अत्यंत कमी प्रमाणात आढळते.

2 / 5

वाळवंटी हवामान, कडाक्याची थंडी, खडकाळ जमीन आणि मर्यादित पर्जन्यमान ही त्यामागची प्रमुख कारणं आहेत. कोणती आहेत ती ठिकाणं? जाणून घेऊयात सविस्तर

3 / 5

ग्रीनलँडचा बहुतांश भाग बर्फाच्या विशाल थरांनी व्यापलेला आहे. येथील हवामान अत्यंत थंड असून अनेक भागांत तापमान शून्याच्या खाली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची वाढ होऊ शकत नाही. मात्र, उन्हाळ्यात काही भागांत गवत, लहान झुडपं आणि इतर वनस्पती आढळतात.

4 / 5

कतार हा पश्चिम आशियातील वाळवंटी हवामान असलेला देश आहे. येथे पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असून उन्हाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढतं. पाण्याची कमतरता आणि कोरडी जमीन यांमुळे नैसर्गिक जंगलं फारच मर्यादित आहेत.

5 / 5

बहरीन हा पर्शियन आखातातील लहान द्वीपसमूह देश आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. येथील हवामान उष्ण आणि कोरडं असल्याने नैसर्गिक वनसंपदा मर्यादित आहे. मात्र, देशात काही ठिकाणी लागवड केलेली झाडं आणि उद्यानं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us