Weather Alert : राज्यात वारं फिरलं, महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, थेट इशारा, हवामान विभागाचा अलर्ट, थेट..
Weather Alert : भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच ज्या गोष्टीची प्रतिक्षा सर्वांना आहे ती बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली. थेट धो धो पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यातील जवळपास भागात ऑक्टोबर हीट जाणवत आहे.त्यातच आता राज्यात पुन्हा पावसाचे दिवस आल्याचे बघायला मिळतंय.भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाने 17 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. ठाणे आणि मुंबईतही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.यादरम्यानच 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या दोन जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट पावसाचा जारी केला.
यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान जोरदार वारे वाहतील. पुण्यातही घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला.