करण जोहर,आदित्य चोपडा नव्हे, हा आहे भारताचा सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता, 26,000 कोटींचा मालक
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अनेक बिग बजेट चित्रपट निर्माण केले आहेत. यातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता कोण आहे हे माहिती आहे का?

कलानिधी मारन - भारतातील सर्वात श्रीमंत फिल्म प्रोड्युसर म्हणून कलानिधी मारन यांचे नाव घेतले जाते. सन पिक्चर्स बॅनर खाली त्यांनी अनेक चित्रपट तयार केले आहेत. रोबोट, पेत्ता, आणि जेलर सारखे मोठ्या फिल्म त्यांनी निर्माण केल्या आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती २६,००० कोटी आहे.

रॉनी स्क्रुवाला - दुसऱ्या नंबरवर रॉनी स्क्रुवाला हे आहेत. हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीनुसार रॉनी स्क्रुवाला यांची नेटवर्थ १३,००० कोटींच्या आसपास आहे.

आदित्य चोपडा - आदित्य चोपडा यांचा क्रमांक तिसरा आहे. न्यूज एक्सच्या बातमीनुसार चित्रपट निर्माते आदित्य चोपडा यांची नेटवर्थ ७,२०० - ७,५०० कोटी आहे.

दिवंगत अर्जन लुल्ला हे इरॉस इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत. त्यांचा मुलगा किशोर लुल्ला यांची एकूण संपत्ती ७,४०० कोटी रुपये आहे.

करण जोहर - करण जोहर श्रीमंतीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहेत. करण जोहर यांची नेटवर्थ १७०० कोटींच्या आसपास असल्याचे वृत्त आहे

गौरी खान - अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सहाव्या क्रमांकावर आहे. मीडियातील वृत्तानुसार गौरी खान हीची संपत्ती १६०० कोटी रुपये आहे.

आमीर खान - आमीर खान याचा क्रमांक सातवा असून आमीर खान याचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. बातम्यानुसार आमीर खानची नेटवर्थ १५०० कोटी आहे.

भूषण कुमार - आठव्या क्रमाकांवर टी सिरीजचे निर्माता भूषण कुमार आहेत. भूषण कुमार यांची नेटवर्थ १४०० कोटी रुपये आहे.

साजिद नाडियाडवाला - नवव्या क्रमांकावर साजिद नाडियाडवाला यांचा क्रमांक आहे. त्यांची नेटवर्थ १,१०० कोटी रुपये आहे.

एकता कपूर - एकता कपूर हीचा क्रमांक श्रीमंत प्रोड्युसरमध्ये दहावा आहे. बालाजी प्रोडक्शन हाऊसची मालक असलेल्या एकता कपूर हीची संपत्ती १०३० कोटी रुपये आहे.