भाजीपाल्यासारखं स्वस्त सोनं कुठे मिळतं? हे देश आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम

भाजीपाला खरेदी करण्याइतक्या सहजपणे करा सोने खरेदी! दुबई, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये सोने स्वस्त मिळण्यामागची रंजक कारणे आणि नियम वाचा.

| Updated on: Apr 22, 2026 | 2:27 PM
1 / 6
सध्या सोन्याचे भाव ऐकले की अंगावर काटा येतो. भारतात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या तरी जगात असे काही देश आहेत जिथे सोनं आजही बऱ्यापैकी स्वस्त मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं कसं शक्य आहे? तर यामागची काही रंजक कारणं समोर आली आहेत.

2 / 6
दुबईला 'सिटी ऑफ गोल्ड' असे म्हटले जाते.  इथे सोन्यावर खूप कमी टॅक्स लागतो. शिवाय, पर्यटकांना तर खरेदीवर काही प्रमाणात टॅक्स परतही मिळतो. यामुळेच  दुबईहून भारतात येणाऱ्या लोकांच्या बॅगेत एखादं तरी सोन्याचं नाणं असतंच.

3 / 6
हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये जर तुम्ही सोन्याचे कॉईन किंवा बिस्कीट घेतले, तर सरकार त्यावर कोणताही जास्तीचा टॅक्स (GST) लावत नाही. म्हणजे निव्वळ सोन्याचे भाव द्या आणि सोनं घरी न्या, असा नियम आहे. यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे देश म्हणजे नंदनवनच आहेत.

4 / 6
तुम्ही चॉकलेटसाठी स्वित्झर्लंड ओळखत असाल, पण हा देश सोन्याच्या शुद्धीकरणाचे (Refining) मोठे केंद्र आहे. जिथे सोनं बनतं तिथेच घेतलं की ते स्वस्त पडतं. त्यामुळे भरपूर साठा असल्याने इथे भाव थोडे कमीच असतात.

5 / 6
थायलंडचे सराफा व्यापारी खूप कमी नफा ठेवून सोनं विकतात. तिथे सोन्याची देवाणघेवाण इतकी फास्ट असते की कमी किंमतीतही त्यांचा चांगला धंदा होतो. परदेशात सोनं स्वस्त मिळतं म्हणून कितीही सोनं विमानाने आणता येत नाही.

6 / 6
भारतात येताना कस्टम ड्युटीचे नियम कडक आहेत. जर मर्यादेबाहेर सोनं आणलं, तर विमानतळावर टॅक्स भरताना नाकी नऊ येऊ शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी नियम नक्की तपासा.

Follow Us