iPhone 18 Pro Max : आयफोन दुरुस्तीसाठी मोजावे लागणार इतके पैसे; स्क्रीनपासून बॅटरीपर्यंतचा खर्च पाहून व्हाल थक्क
तुम्ही आयफोन वापरता का? मग तुम्हाला हे माहीतच असले पाहिजे. नुकताच लाँच झालेला आयफोन १८ ची बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन दिसायला जेवढा भारी आहे तेवढाच महाग देखील आहे. तसेच हा आयफोन दुरुस्त करायला किती खर्च येतो माहीत आहे का? जाणून घ्यायचं असेल तर खालील माहिती लगेच वाचा.

आयफोन १८ प्रो मॅक्स दुरुस्तीचा खर्च: आयफोन प्रो सिरीजचे मॉडेल्स हे स्मार्टफोन शौकिनांसाठी एक स्वप्नवत मॉडेल आहे. प्रो मॅक्स मॉडेल्स हे आयफोन मधील सर्वात महाग मॉडेल्स आहेत. नवीन आयफोन १८ प्रो मॉडेल्स बाजारात आले असून त्यांची विक्रीही सुरू झाली आहे. आयफोन प्रो मॅक्स मॉडेल खरेदी करणे ही सर्वात महागडी गोष्ट आहे. तसेच ते दुरुस्त करणं देखील तेवढंच महाग आहे.
भारतातील आयफोन 18 प्रो मॅक्सच्या व्हेरिएंट्सच्या किमती सर्वांना आधीच माहीत आहेत. 256GB व्हेरिएंटची किंमत रु. 1,79,900, 512GB व्हेरिएंटची किंमत रु. 2,04,900, 1TB व्हेरिएंटची किंमत रु. 2,54,900 आणि 2TB व्हेरिएंटची किंमत रु. 3,29,900 आहे. तथापि, बऱ्याच लोकांना ही किंमत माहीत असली तरी, त्याच्या दुरुस्तीच्या खर्चाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बऱ्याच लोकांना या किमती माहीत नाहीत. म्हणूनच आम्ही तज्ञांच्या आणि इतर वेबसाइट्सच्या माहितीनुसार हा खर्चाची माहिती तुम्हाला देणार आहोत.
जशी मोबाईलची किंमत जास्त आहे, तसाच आयफोन १८ प्रो मॅक्सच्या दुरुस्तीचा खर्चही थोडा जास्त आहे. आयफोन १८ प्रो मॅक्सच्या कोणत्याही दुरुस्तीशी संबंधित सहा प्रकार आहेत. ॲपलच्या दुरुस्तीमधील हे सहा प्रकार आहेत: बॅटरी, मागील काचेतील दोष, मागील कॅमेऱ्याच्या समस्या, स्क्रीनचे नुकसान, स्क्रीनला झालेली इजा, मागील पॅनलची काच. तसेच इतर प्रकारचे नुकसान. आता आपण पाहूया की याच्याशी संबंधित कोणतीही दुरुस्ती केल्यास किती खर्च येतो..
भारतात आयफोन 18 प्रो मॅक्स दुरुस्तीचा खर्च: बॅटरी सर्व्हिससाठी रु. 13,900, खराब झालेल्या मागील पॅनल ग्लास बदलण्यासाठी रु. 16,900, मागील कॅमेरा दुरुस्तीसाठी रु. 28,900.
आयफोन १८ प्रो मॅक्सची स्क्रीन खराब झाली असल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी ४२,९०० रुपये खर्च येईल. स्क्रीन आणि मागील काच दोन्ही खराब झाल्यास, एकत्रित खर्च ५१,९०० रुपये येईल. या यादीत नमूद नसलेले नुकसान झाल्यास, खर्च १,१७,९०० रुपये येईल.
जरी ॲपलच्या सेवा, फोनची सर्व्हिसिंग करणे थोडे महाग असले तरी, ते अधिक विश्वसनीय आहे. वापरकर्ते 'जीनियस बार' किंवा ॲपलच्या अधिकृत सेवा केंद्रांमार्फत मदत मिळवू शकतात. जीनियस बार हे ॲपल स्टोअर्समधील असे ठिकाण आहे, जिथे ॲपल उत्पादनांसाठी तांत्रिक सहाय्य आणि हार्डवेअर दुरुस्तीची सुविधा पुरवली जाते. जर तुमचा आयफोन 'ॲपल केअर+' अंतर्गत समाविष्ट असेल, तर सेवेचा खर्च पूर्णपणे वेगळा असतो.