भारताला सर्वात मोठा धक्का, होर्मुझबाबत इराणची हादरवून टाकणारी घोषणा, तेलाची किंमत…अमेरिकेलाही फुटला घाम!

मिळालेल्या माहितीनुसार इराणने आता अमेरिकेशी चर्चा करणे थांबवले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलकडून लेबनॉनवर मोठे हल्ले केले जात आहेत. हे हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळेच इराणने ही भूमिका घेतलेली आहे.

| Updated on: Jun 01, 2026 | 9:59 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीवर चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. परंतु आता सर्वांनाच धक्का देणारी माहिती समोर आली आहे. इराणच्या भूमिकामुळे भारताला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार इराणने आता अमेरिकेशी चर्चा करणे थांबवले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलकडून लेबनॉनवर मोठे हल्ले केले जात आहेत. हे हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळेच इराणने ही भूमिका घेतलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराणने आता अमेरिकेशी चर्चा करणे थांबवले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलकडून लेबनॉनवर मोठे हल्ले केले जात आहेत. हे हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळेच इराणने ही भूमिका घेतलेली आहे.

3 / 5
इराणने अमेरिकेकडे चर्चा थांबवण्याविषयी कोणताही संदेश दिलेला नाही. परंतु  लेबनॉन आणि गाझाविषयी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत चर्चा पुन्हा सुरू होणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या या भूमिकेविषयी न्यूज एजन्सी तसनीमने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

4 / 5
या रिपोर्टनुसार इराणची ही भूमिका म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.  इराणच्या या भूमिकेमुळे आता युद्धबंदी करार आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याविषयी केले जाणारे दावेही आता फोल ठरले आहेत.

5 / 5
होर्मुझची सामुद्रधुनी अजूनही बंदच आहे. ती लवकर खुली होण्याची शक्यता नाही, असे तसनीम या न्यूज एजन्सीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या रिपोर्टनंतर कच्च्या तेलाचा भाव पाच टक्क्यांनी वाढला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे आता भारतातही इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारताचेही टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us