थर्मोसमध्ये साठवलेला चहा किती वेळाने पिऊ नये? या मर्यादा नक्की पाळा

थर्मोसमध्ये चहा जास्त वेळ साठवून ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? चहा किती वेळ सुरक्षित राहतो आणि त्यातून होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे या लेखातून जाणून घ्या.

| Updated on: Apr 14, 2026 | 2:52 PM
1 / 6
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासात किंवा ऑफिसमध्ये गरम चहा पिण्यासाठी थर्मासचा वापर करतात. पण थर्मोसमध्ये जास्त वेळ चहा साठवून ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर चांगला असतो की नाही, याबद्दल आपण जाणून घेऊया.

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासात किंवा ऑफिसमध्ये गरम चहा पिण्यासाठी थर्मासचा वापर करतात. पण थर्मोसमध्ये जास्त वेळ चहा साठवून ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर चांगला असतो की नाही, याबद्दल आपण जाणून घेऊया.

2 / 6

तज्ज्ञांच्या मते, थर्मोसमध्ये चहा साठवताना वेळेचे भान राखणे अत्यंत गरजेचे आहे. ताजा बनवलेला चहा चांगल्या दर्जाच्या थर्मोसमध्ये ठेवल्यास तो २ ते ४ तास अतिशय उत्तम राहतो.

3 / 6

असा चहा ६ तासांपर्यंत पिणे सुरक्षित मानले जाते. मात्र, ८ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेला चहा पिणे टाळावे. कारण त्यानंतर चहाची चव आणि सुगंध कमी होतोच, पण त्यासोबत आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

4 / 6

चहा जास्त वेळ साठवल्यास त्यात जिवाणू वेगाने वाढू लागतात. विशेषतः दुधाच्या चहामध्ये हा धोका अधिक असतो. शिळ्या चहामुळे गॅस, ॲसिडिटी किंवा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो.

5 / 6

थर्मासमध्ये जास्त वेळ चहा गरम राहिल्याने त्यातील पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात. त्यामुळे शक्यतो ४ तासांच्या आत चहा संपवावा. शक्य असेल तर नेहमी ताज्या चहाचाच आस्वाद घ्यावा.

6 / 6

जास्त वेळ चहा साठवून ठेवायचा असेल, तर दुधाचा चहा ठेवण्याऐवजी ब्लॅक टी किंवा हर्बल टीचा पर्याय निवडावा. थर्मोस रोजच्या रोज गरम पाण्याने स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडा करावा, जेणेकरून जुन्या जीवाणूंचा संसर्ग होणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us