तुमचे हृदय कमजोर तर नाही ना ? या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका

चला तर पाहूयात हार्ट कमजोर झाल्यानंतर शरीरात कोण-कोणती लक्षणे दिसतात ? आणि कोणत्या संकेतानंतर सर्तक व्हायला हवे ?

| Updated on: Oct 19, 2026 | 7:04 PM
1 / 5
 हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवापैकी आहे. हृदय शरीरात रक्त पोहचवण्याचे काम करते. परंतू जेव्हा हार्ट नीट काम करत नसेल तर शरीर अनेक प्रकारचे संकेत देते. पुणे स्थित इनामदार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन स्पेशालिस्ट आणि जनरल फिजीशियन डॉ.शालिनी सिंह साळुंखे यांनी कमजोर हार्टची ओळख कशी करावी याची माहिती दिली आहे.

2 / 5

जेवल्यानंतर येतेय सुस्ती - जर जेवल्यानंतर जास्त सुस्ती येत असेल किंवा छातीत वेदना होत असतील तर तुम्ही या स्थितीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. अनेकदा याच्या मागे कमजोर हार्ट जबाबदार असू शकते.

3 / 5

सायंकाळी पायात सूज : जर सायंकाळी तुमच्या पायात किंवा पायाच्या घोट्यात सूज येत असेल तर हे देखील हार्ट कमजोर होण्याचे एक लक्षण आहे. वास्तविक याला पिटिंग एडिमा म्हणतात.जेव्हा हृदय कमजोर झाल्याने शरीर रक्त नीट पंप करु शकत नाही. तेव्हा पायात फ्ल्युईड जमा होऊ लागते.

4 / 5

वाकताना दम लागणे : डॉक्टर शालिनी सिंह साळुंखे यांच्या मते जर खाली झुकताना दम लागत असेल तर हा देखील हृदय कमजोर होण्याचा एक संकेत आहे. या स्थितीला मेडिकलच्या भाषेत बेंडोपनिया म्हणतात.

5 / 5

जेवनानंतर ब्लोटिंग: डॉक्टर शालिनी सिंह साळुंखे यांच्या मते जरासे काही खाल्ल्यानंतर तर पोट फुगत असेल. किंवा ब्लोटिंगची समस्या निर्माण होत असेल तर या कंडीशन हलक्यात घेऊ नका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us