आता कन्फर्म सांगायला हरकत नाही..; जान्हवी किल्लेकरने भरली सूरज चव्हाणच्या बायकोची चोर ओटी

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. सूरजच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नुकतीच त्याच्या बायकोची चोर ओटी भरली आहे.

| Updated on: Jun 11, 2026 | 11:14 AM
1 / 5
'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी संजना गरोदर असून अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने तिची चोर ओटी भरली आहे. ही चोर ओटी भरतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावरून जान्हवी आणि सूरज यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

2 / 5
'मार्च महिन्यात भरलेल्या चोरओटीचा व्हिडीओ आता शेअर करतेय. कारण आता कन्फर्म सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सूरज लवकरच बाबा होणार आहे', असं कॅप्शन जान्हवीने तिच्या व्हिडीओला दिलं आहे. जान्हवीनेच सूरज आणि संजनाच्या गुड न्यूजवर शिक्कामोर्तब केला आहे.

3 / 5
जान्हवीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. अभिनेता ओम यादवनेही जान्हवीसाठी कमेंट केली आहे. 'अभिमान वाटतो तुझा जान्हवी. तू फक्त नाती बोलून दाखवत नाहीस तर निभावून पण दाखवतेस. शब्द नाहीत तुझ्यासाठी', असं त्याने म्हटलंय.

4 / 5
'खरंच तू एवढी मोठी अभिनेत्री असून सर्व पद्धती, विधी तुला नीट माहीत आहेत. जान्हवीचा हाच स्वभाव सर्वांना खूप आवडतो', असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर जान्हवी मनापासून नाती सांभाळतेय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिची प्रशंसा केली आहे.

5 / 5
सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न केलं होतं. बारामतीत अत्यंत थाटात हा लग्नसोहळा पार पडला होता. संजना ही सूरजची मामेबहीण आहे. या दोघांच्या लग्नाला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची काही मंडळी उपस्थित होती.

Follow Us