Gold Reserve : भारताच्या मित्र देशाला समुद्राच्या तळाशी सापडली सोन्याची लंका, ज्वालामुखी क्षेत्रात खजिन्याचा अवाका पाहून शास्त्रज्ञही हैराण

Gold Reserve : भारतात सध्या एक तोळा सोन्याची किंमत 1 लाख 40 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडत असताना एखाद्या देशाला सोन्याचा खजाना मिळाला, तर विचार करा तो देश किती मालामाल होईल.

| Updated on: Jul 15, 2026 | 3:46 PM
1 / 5
जगातील एका देशाला सोन्याचं सर्वात मोठं भंडार सापडलं आहे. ते सुद्धा समुद्राच्या तळाशी 700 मीटर खाली. जगातील हा सर्वात मोठा सोन्याचा खजिना शोधून काढला आहे. सोन्याचं इतकं मोठं भंडार कदाचितच कुठल्या देशाला मिळालं असेल. getty images

जगातील एका देशाला सोन्याचं सर्वात मोठं भंडार सापडलं आहे. ते सुद्धा समुद्राच्या तळाशी 700 मीटर खाली. जगातील हा सर्वात मोठा सोन्याचा खजिना शोधून काढला आहे. सोन्याचं इतकं मोठं भंडार कदाचितच कुठल्या देशाला मिळालं असेल. getty images

2 / 5

जपानच्या वैज्ञानिकांनी डोळ्यांना न दिसणारा हा सोन्याचा खजाना शोधून काढला आहे. जपानची राजधानी टोक्योपासून 360 किलोमीटर लांब समुद्रात हा सोन्याचा खजिना सापडला आहे. हे काही सामान्य गोल्ड नाही, दगडांच्या आत दडलेलं हे सोनं आहे. getty images

3 / 5

समुद्राच्या पुष्ठभागावर ज्वालामुखी असलेल्या क्षेत्रात सोन्याचं हे भंडार मिळालं आहे. हायड्रोथर्मल क्षेत्रात सोन्याचा हा शोध लागला आहे. समु्द्राच्या खाली हायड्रोथर्मल वेंट्सच्या आसपास सोनं मिळाल्याचं वैज्ञानिकांना फार आधीपासून माहित आहे. पण आता समजलय की हे सोनं आधीच्या सर्व रेकॉर्डसपेक्षा जास्त आहे. हे महागडं सोनं दिसणाऱ्या तुकड्यांच्या स्वरुपात नाही. एकदम सामान्य वाटणाऱ्या खनिजांच्या आत आहे. getty images

4 / 5

दगडांमध्ये असलेलं हे सोनं पाहून वैज्ञानिक सुद्धा हैराण झालेत. सोन्याचं भंडार शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकांनी रोबोटिक पाणबुड्यांच्या मदतीने समुद्राच्या खालून दगडांचे नमुने एकत्र केले. लॅबमध्ये फोडून त्यांचं परिक्षण केलं. यासाठी सेकेंडरी-आयन मास स्पेक्ट्रोमेट्री टेक्नोलॉजीचा वापर झाला. प्रयोगशाळेत तपासणीत समजलं की, दगडांमध्ये सोनं खूप जास्त प्रमाणात आहे. getty images

5 / 5

खाणीमध्ये सोनं तुकड्यांच्या स्वरुपात असतं. समुद्रात मिळालेलं हे सोनं एकदम वेगळं आहे. सीफ्लोर पाइराइट क्रिस्टल लॅटिसच्या आत एक सॉलिड सॉल्यूशनच्या रुपात हे सोनं आहे. सोनं दगडाच्या आतं कसं यामुळे वैज्ञानिक हैराण आहेत. getty images

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us