अख्खा देश होतोय रिकामा, लोक होतायत अचानक गायब; जपानमध्ये नेमकं काय घडतंय?

या देशापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. या देशातील लोक अचानकपणे कमी होत आहेत. ही अडचण पाहून सरकारचेही टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: Dec 13, 2025 | 6:48 PM
1 / 5
जपान देशात सध्या अजब घडत आहे. येथे लोकसंख्या वाढत नसून ती चक्क कमी होत आहे. त्यामुळेच तेथील सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानमध्ये एका वर्षात लोकसंख्येत तब्बल 9 लाखांनी घट झाली आहे.

2 / 5
म्हणजेच जपानमध्ये एका वर्षात साधारण 9 लाख लोक कमी झाले आहेत. येथे जन्मदर आणि मृत्यूदरात मोठी तफावत दिसून येत आहे. ही आकडेवारी पाहून जपानमध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात असून एका वर्षात 9 लाखांनी लोकसंख्या कमी होणे धोकादायक म्हटले जात आहे.

3 / 5
जपानची लोकसंख्या साधारण 12.5 कोटी आहे. अशा स्थितीत एका वर्षात साधारण 9 लाख कमी होणे हे धोक्याचे लक्षण असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जपानमध्ये लोकसंख्या घटन्याचे प्रमाण कायम आहे. घटत असलेला जन्मदर आणि वाढत असलेले आयुर्मान यामुळे जपानाच्या लोकसंख्येत घट होत आहे.

4 / 5
जपानमधील लोकसंख्या वाढीचा वेग वाढावा यासाठी तेथील सरकारकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. परंतु या प्रयत्नांना अजूनतरी फारसे यश आलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून सरकारतर्फे अपत्ये वाढवण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

5 / 5
मात्र तरीदेखील लोकसंख्या वाढलेली नाही. त्यामुळे आता जपान भविष्यात नेमकं काय-करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही परिस्थिती असीच राहील भविष्यात जपानपुढे नवी संकटं उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच जपानी सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याचे आवाहन तेथील तज्ज्ञांकडून केले जात आहे.