Jio Plan : जिओचा सर्वात भारी रिचार्ज प्लॅन, एकदा रिचार्ज केलं की…तब्बल वाचणार 35000 रुपये!

जिओ कंपनीने एका नवा आणि भन्नाट प्रिपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या रिचार्ज प्लॅनमुळे लोकांचे हजारो रुपये वाचू शकतात. या प्लॅनमध्ये काय काय मिळणार, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 04, 2026 | 4:28 PM
1 / 5
जिओ ही टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक आकर्षक आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅन आणलेले आहेत. आता पुन्हा एकदा या कंपनीने नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

जिओ ही टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक आकर्षक आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅन आणलेले आहेत. आता पुन्हा एकदा या कंपनीने नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

2 / 5

या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 42 जीबीचा डेटा मिळेल. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात आलेली आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ कंपनीकडून आपल्या ग्राहकांना 5 हजार जीबीपर्यंत क्लाऊड स्टोअरेजही दिले जाणार आहे.

3 / 5

जे युजर्स एआयचा अधिक वापर करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण या प्लॅनमध्ये युजर्सना गुगल जेमिनीचे नॅनो बनाना फिचरचे सबस्क्रिप्शनही दिले जाणार आहे. जिओचा हा रिचार्ज प्लॅन 329 रुपयांना आहे. हा एक प्रिपेड प्लॅन आहे.

4 / 5

या प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंग आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्नसा प्रत्येक दिवसी दीड जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये रोज 100 मेसेजही फ्री असतील.

5 / 5

याच प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 18 महिन्यांसाठी गुगल जेमिनीचे प्रो सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या सबस्क्रिप्शनची किंमत 35100 रुपये आहे. याच प्लॅनमध्ये जिओ सावन प्रो, जिओ टिव्ही, जिओ एआय क्लाऊडचाही तुम्हाला अॅक्सेस मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us