जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी; घराच्या दरावाजाजवळच…राजकीय वर्तुळात खळबळ

जिंतेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

| Updated on: Oct 19, 2026 | 2:11 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी भर रस्त्यात त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. तीन आरोपींनी त्याच्या कारवर गोळीबार केला. या गोळीबारात टायगर थोडक्यात बचावला. टायगरनंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना उघडकीस आली आहे.

2 / 5

जितेंद्र आव्हाड यांना धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी देणाऱ्याची माहिती उघड केली आहे.

3 / 5

जितेंद्र आव्हाड यांना रात्री धमकीचा फोन आला. धमकी देणाऱ्याने दोन-तीन वेळा फोन करत अर्वाच्च भाषेत बोलत धमकी दिल्याची माहिती आहे.

4 / 5

आव्हाड यांना दुपारी 4.30 वाजल्यापासून धमकी मिळत होती. या प्रकारानंतर आव्हाड यांनी धमकी देणाऱ्याची माहिती सोशल मीडियावर दिली.

5 / 5

धमकी देणारा व्यक्ती घराच्या दरवाजाजवळ उभी असल्याचं फोनवरून सांगत असल्याचंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us