‘धुरंधर 2’चाही बाप होता सनी देओलचा हा चित्रपट; 25 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर आणलेलं वादळ

'धुरंधर 2' या चित्रपटाप्रमाणेच 25 वर्षांपूर्वी सनी देओलच्या एका चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली होती. सनी देओलच्या करिअरमधील हा सर्वांत हिट चित्रपट ठरला होता.

| Updated on: Apr 15, 2026 | 3:58 PM
1 / 5
रणवीर सिंहचा 'धुरंधर : द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या चित्रपटाचा सर्वत्र बोलबोला असून रणवीर सिंहच्या करिअरमधील हा सर्वांत ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 25 वर्षांपूर्वी सनी देओलच्या एका चित्रपटाने अशाच प्रकारे बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवलं होतं.

2 / 5
अवघ्या 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या सनी देओलच्या या चित्रपटाने ऐतिहासिक कमाई करत सर्वांनाच थक्क केलं होतं. ज्याप्रकारे 'धुरंधर 2' हा चित्रपट रणवीरच्या करिअरमधील मोठा चित्रपट ठरला आहे, त्याचप्रकारे सनी देओलच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट हा चित्रपट ठरला होता.

3 / 5
सनी देओलच्या या चित्रपटावरून त्यावेळी मोठा वादसुद्धा झाला होता. एका विशेष समुदायाच्या लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. इतकंच नव्हे तर त्यावेळी थिएटरमध्ये तोडफोडसुद्धा झाली होती. असं असूनही या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागला नव्हता. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'गदर : एक प्रेम कथा' आहे.

4 / 5
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर : एक प्रेम कथा' हा चित्रपट सनी देओलच्या करिअरमधील सर्वांत यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. इतकंच नव्हे तर ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये याची गणना केली जाते. तारा सिंह आणि सकिना यांच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती.

5 / 5
'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार 'गदर'ने देशभरात 76 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. इतकंच नव्हे तर जगभरात या चित्रपटाने ऐतिहासिक कमाई करत 111 कोटी रुपयांहून अधिकचा बिझनेस केला होता.

Follow Us