Multibagger Share: जबराट…65 पैशांच्या पेनी शेअरची कमाल, 1 लाखांचे केले 50 लाख, गुंतवणूकदारांना आकाश ठेंगणे

Multibagger penny share: या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करणे ही मोठी जोखीम मानली जाते. पण या शेअरने 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 50 लाखांचा परतावा दिला आहे.

| Updated on: Feb 20, 2026 | 4:40 PM
1 / 6
Kabra Drugs Multibagger penny share ने बाजारात धुमाकूळ घातला आहे. तसा हा पेनी शेअर म्हणजे अत्यंत जोखीमाचा मानल्या जातो. पण गेल्या सहा वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कोरोनापूर्वी ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक स्थिर ठेवली, त्यांना आता मोठा परतावा मिळाला आहे.

2 / 6
काबरा ड्रग्सचा शेअर फेब्रुवारी 2019 मध्ये अवघ्या 0.65 पैशांवर होता. हा शेअर बीएसईवर आज 0.59 टक्के घसरणीसह 32.60 रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या सात वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 4,960 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला आहे. म्हणजे सात वर्षांपूर्वी जर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 50 लाख रुपये झाले असते.

3 / 6
काबरा ड्रग्सच्या स्टॉकने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कमाई करून दिली आहे. या शेअरने पाच वर्षात 589 टक्के, तीन वर्षांमध्ये 514 टक्के, तर गेल्या वर्षभरात या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना 209 टक्के, सहा महिन्यांत 65 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या महिनाभरात हा शेअर 17 टक्क्यांनी वधारला आहे.

4 / 6
कंपनीचा तिमाही निकालही समोर आला आहे. काबरा ड्रग्सने त्यात आघाडी घेतली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 578 टक्क्यांची वाढ होऊन तो 2.56 कोटींवर पोहचला आहे. कंपनीचा महसूल 30.42 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यातही चांगलीच वाढ झालेली दिसून येते.

5 / 6
कंपनीचे देशभरात जाळे वाढत असून कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला अनेक धोरणात्मक बदल आणि निर्णय घेतले आहेत. कंपनीने एका कंपनीच्या अधिग्रहणालाही मंजूरी दिली आहे. कंपनीने वितरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही दिवसात या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.