दसऱ्यासाठी काजोलचा खास लूक, साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, असा लूक तुम्हीही करु शकता फॉलो
अभिनेत्री काजोल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काजोल प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सध्या सर्वत्र तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....
साडीत काजोल हिने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्री हा लूक तुम्ही देखील दसऱ्याच्या मुहूर्तावर फॉलो करु शकता. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. काजोल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...
काजोल हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'येथे दृष्टिकोन आणि कृतज्ञता, दोन्ही दिसून येतात.' असं लिहिलं आहे. एवढंच नाही तर, काजोल हिने दसऱ्याच्या शुभेच्छा देखील चाहत्यांना दिल्या आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.