जेवणाची एक प्लेट 35000 रुपयांना? काव्या मारन- अनिरुद्धच्या लग्नाला किती कोटींचा खर्च? आकडा वाचून थक्क व्हाल!
ग्रीसमधील सेंटोरिनी, मायकोनोस आणि अथेन्स ही विवाहसोहळ्यांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत. येथे आलिशान व्हेन्यू किंवा रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे साधारण 15 ते 45 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. दोघेही ग्रीसमध्ये शाही पद्धतीने विवाह करू शकतात. मात्र, या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांचा विवाह 11 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये 21 नोव्हेंबरला भव्य रिसेप्शन होणार असल्याचीही चर्चा आहे. या सोहळ्याला चित्रपट, क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ग्रीस हे सुंदर समुद्रकिनारे आणि नयनरम्य ठिकाणांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे श्रीमंत कुटुंबांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी या देशाला पसंती दिली जाते. या ठिकाणी विवाह करायचा असेल तर 100 ते 150 पाहुण्यांसाठी तीन ते चार दिवसांचा सुमारे 1.5 ते 3.5 कोटी रुपये असू शकतो.
ग्रीसमधील सेंटोरिनी, मायकोनोस आणि अथेन्स ही विवाहसोहळ्यांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत. येथे आलिशान व्हेन्यू किंवा रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे साधारण 15 ते 45 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. पाहुण्यांचा मुक्काम, प्रवास आणि डेकोरेशनमुळे लग्नाचा हा खर्च आणखी वाढू शकतो.
ग्रीसमध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी केटरिंग आणि सजावटीचा खर्चही मोठा असतो. प्राथमिक अंदाजानुसार, एका पाहुण्याच्या जेवणाच्या प्लेटची किंमत साधारण 15 हजार ते 35 हजार रुपये असू शकते. काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्या संभाव्य विवाहसोहळ्याच्या खर्चाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.