Anirudh Ravichander Family: अनिरुद्धशी लग्न करणाऱ्या काव्या मारनच्या सासरी कोण-कोण? रजनीकांत यांच्याशी खास नातं

Kavya Maran and Anirudha: क्रिकेट, व्यवसाय आणि चित्रपटसृष्टी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या या दोघांच्या विवाहाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता त्यांच्या लग्नाबाबत दोघांकडून अधिकृत घोषणा कधी होते, याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

| Updated on: Oct 18, 2026 | 12:54 PM
1 / 8
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या मनोरंजनविश्वाचं लक्ष वेधलं आहे. या चर्चांमुळे दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या मनोरंजनविश्वाचं लक्ष वेधलं आहे. या चर्चांमुळे दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली आहे.

2 / 8

अनिरुद्धचं कुटुंब तमिळ चित्रपटसृष्टीशी जोडलेलं असून, सुपरस्टार रजनीकांत यांच्याशीही त्याचं जवळचं नातं आहे. त्यामुळे काव्या मारनचं संभाव्य सासर नेमकं कसं आहे, याची चर्चा रंगू लागली आहे. अनिरुद्ध रविचंदर हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचा संगीतकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या संगीताने अनेक चित्रपट लोकप्रिय झाले असून, तरुणांमध्येही त्याची मोठी क्रेझ आहे.

3 / 8

अनिरुद्धचे वडील रवी राघवेंद्र हे तमिळ चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील अभिनेते आहेत. अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनिरुद्धला लहानपणापासूनच मनोरंजनविश्वातील वातावरण जवळून अनुभवायला मिळालं.

4 / 8

अनिरुद्धची आई लक्ष्मी रविचंदर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. कुटुंबातील कलाक्षेत्राशी असलेलं नातं अनिरुद्धच्या व्यक्तिमत्त्वातही दिसून येतं. संगीत आणि अभिनय अशा दोन वेगवेगळ्या कलाप्रकारांशी जोडलेल्या कुटुंबात वाढल्यामुळे त्याला कलेची जवळून ओळख झाली. अनिरुद्धची बहीण वैष्णवी रविचंदर हिचाही कुटुंबात समावेश आहे.

5 / 8

अनिरुद्धच्या कुटुंबातील सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी असलेलं नातं. अनिरुद्धची आत्या लता रजनीकांत यांचा विवाह रजनीकांत यांच्याशी झाला आहे. त्यामुळे रजनीकांत हे अनिरुद्धचे नात्याने आत्याचे पती आहेत. रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या रजनीकांत आणि सौंदर्या रजनीकांत या अनिरुद्धच्या चुलत बहिणी आहेत.

6 / 8

दोघीही चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन आणि निर्मितीशी संबंधित कामासाठी ओळखल्या जातात. या नात्यामुळे अनिरुद्धचं कुटुंब तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी जोडलेलं आहे.

7 / 8

दरम्यान, अनिरुद्ध आणि काव्या मारन यांच्या लग्नाविषयीही विविध वृत्तांमधून माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचा विवाह 11 नोव्हेंबर 2026 रोजी ग्रीसमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये रिसेप्शन आयोजित केलं जाणार असल्याचंही वृत्त आहे.

8 / 8

काव्याचे वडील आणि सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांनी रिसेप्शनसाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण दिल्याच्या बातम्यांमुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे. काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्या नात्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us