Kia Carens : किया कंपनीने विक्री केलेल्या 30 हजाराहून अधिक कॅरेंस गाड्या परत मागवल्या, कारण…
Kia Carens Recall India: किया कंपनीच्या गाड्यांना भारतात जबरदस्त मागणी आहे. किया कॅरेंस कंपनीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारं मॉडेल आहे. पण कंपनीने आता 30 हजार गाड्या परत मागवल्याने कारप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

दक्षिण कोरियन किया कंपनीची कॅरेंस गाडी तिसरी बेस्ट सेलिंग कार आहे. मात्र आता ही गाडी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कंपनीने 30 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच केल्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा गाड्या परत मागवल्या आहेत. (Photo: Kia)
CAR SAFETY
car safty
कंपनीने 30 हजाराहून अधिक गाड्या सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी मागवल्या आहेत. या प्रोसेसमध्ये ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी कंपनी ग्राहकांशी थेट संपर्क साधणार आहे. तसेच रिकॉलची माहिती देणार आहे. तसेच ग्राहक जवळच्या डिलरकडे संपर्क साधू शकतात. (Photo: Kia)
किया कंपनीने यावर्षी कॅरेंसच्या लग्झरी (o) व्हेरियंद लाँच केलं आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 17 लाख रुपये एक्स शोरुम आहे. हे व्हेरियंट खासरून ऑटोमेटिक पेट्रोल आणि डिझेल पर्यायासह आहे. किया कॅरेंस एमपीव्हीची एक्स शोरुम किंमत 10.44 लाख रुपये आहे. (Photo: Kia)