How To Clean Steel Utensils : स्टीलची जुनी भांडी चांदीसारखी चमकतील; जाणून घ्या घरगुती फंडा
स्टीलची भांडी काही महिन्यानंतर काळी पडतात. या भांड्यावर अनेक डाग दिसून येतात. अनेकांना स्टीलची भांडी योग्य पद्धतीने स्वच्छ करण्याची माहिती नसते. जाणून घरगुती फंडा

नव्याने घेतलेली स्टीलच्या भांडी ठरविक वेळेनंतर चमकत नाही. दररोज भांडी वापरल्याने चमक निघून जाते. तसेच डाग देखील दिसतात. दररोजच्या वापरामुळे भांडी काळी पडू लागतात.
स्टीलची भांडी चमकवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही दोन चमचे बेकिंग सोडा छोट्या बादलीमध्ये गरम पाणी घ्या. या बादलीत 30 मिनिटे भांडी पाण्यात ठेवावी. नंतर भांडी स्वच्छ धुवावी.
जुन्या भांड्यावरील काळ्या रंगाचा थर स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करता येऊ शकतो. एका भांड्यात दोन चमचे व्हिेनेगार घ्यावे. त्यानंतर व्हिनेगर काळ्या पडलेल्या भांड्यावर लावावे. काही वेळानंतर भांडी स्वच्छ घासून घ्यावीत.
एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्रित करून घ्यावा. तुम्ही यात पाणी देखील मिश्रीत करू शकता. यात मिश्रण भांड्यावर लावून तासभर तशीच ठेवावीत.
तासाभरानंतर गरम पाण्याने भांडी स्वच्छ घासून घ्यावी. या मिश्रणाने भांड्यावर जमा झालेली घाण स्वच्छ होईल.