किचनमध्ये गॅसच्या शेगडीजवळ कोणत्या वस्तू ठेवणे टाळले पाहिजे? अन्यथा…
किचनमध्ये गॅस शेगडीजवळ काही गोष्टी ठेवणे कटाक्षाने टाळले पाहिजे. गॅसच्या शेगडीजवळ काही वस्तू ठेवल्यातर आग लागण्याची शक्यता असते.

गॅसच्या शेगडीवर जेवण करताना किचनवर तेलाची बॉटल ठेवणे टाळले पाहिजे. वापर झाल्यानंतर तातडीने योग्य ठिकाणी ठेवले पाहिजे. तेलामुळे आग लागण्याची शक्यता असते.
किचनमध्ये गॅसच्या शेगडीजवळ काही गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे. काही वस्तू ठेवल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. साफसफाईसहित सुरक्षेचा देखी विचार केला पाहिजे. खरंतर गॅसजवळ अनेक मसाले, तेलाची बॉटल, पेपर, टॉवेल, प्लास्टिकचे डबे ठेवतात. परंतु किचनच्या सुरक्षेचा विचार करता गॅसच्या शेगडीजवळ काही गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.
काही जण गॅसच्या शेगडीजवळ कापड किंवा वर्तमानपत्र ठेवताना आढळून येतात. कापड किंवा कागदामुळे आग लागण्याची भीती असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी किचनजवळ ठेवणे टाळले पाहिजे.
लाकडी चमचे आणि इतर लाकडी वस्तू गॅसच्या शेगडीजवळ ठेवणे टाळले पाहिजे. लाकडी वस्तू गॅस, उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने गरम होतात. त्यामुळे लाकडी वस्तू खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे लाकडी वस्तू गॅसपासून दूर ठेवावी.