Photo : माती आणि पत्र्याचं घर, कचऱ्याचा ढिग… आठराविश्व दारिद्रय; पण पठ्ठ्याने गाजवलं व्हिएतनाम; थेट सुवर्णपदकच जिंकलं

फक्त एक एकर शेती, वडिलांनी अपार कष्ट करून मुलाला बनवलं पैलवान, कोल्हापुरातील अक्षयने आशियाई कुस्ती स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, सर्व स्तरांतून होतोय कौतुकाचा वर्षाव.

| Updated on: May 26, 2026 | 2:33 PM
1 / 5
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एकोंडी गावच्या अक्षय ढेरे याने व्हिएतनाम येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एकोंडी गावच्या अक्षय ढेरे याने व्हिएतनाम येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

2 / 5

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून आलेल्या अक्षयच्या या यशामुळे त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अक्षयचे वडील तानाजी ढेरे हे गेली वीस वर्षे एका सहकारी संस्थेत अल्प पगारावर नोकरी करत आहेत.

3 / 5

कुटुंबाकडे केवळ एक एकर शेती असतानाही त्यांनी मुलाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवत मोठे कष्ट घेतले. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत त्यांनी शेतीसोबत इतरांची शेती भागाने केली, पशुपालनाचा व्यवसाय केला आणि अक्षयच्या सरावासाठी लागणारा खर्च उचलला.

4 / 5

अक्षयने वयाच्या बाराव्या वर्षी गावातील तालमीत कुस्तीचा सराव सुरू केला. पुढे अधिक चांगल्या प्रशिक्षणासाठी त्याने दिंडनेर्ली येथे सरावास सुरुवात केली. त्यासाठी दरमहा सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च येत होता. मात्र आर्थिक अडचणी असूनही कुटुंबाने त्याला कोणतीही कमतरता भासू दिली नाही.

5 / 5

दरम्यान, अक्षयची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून सध्या तो पुणे येथे सराव करत आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर आता त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत कोल्हापूर जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us