‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील जीवा-नंदिनीचं हटके प्री-वेडिंग शूट चर्चेत

'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं हटके प्री-वेडिंग शूट चर्चेत आलं आहे.

| Updated on: Feb 26, 2026 | 9:28 AM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या लग्नाची तयारी जल्लोषात सुरू झाली आहे. लग्नानंतर प्रेम झालं आणि आता प्रेमानंतर लग्न होणार तेही अगदी साग्रसंगीत.

2 / 5
या आनंदाच्या क्षणी मालिकेतील दोन्ही लोकप्रिय जोड्यांनी नुकतंच एक हटके आणि वेगळ्या धाटणीचं प्री-वेडिंग शूट केलं आहे. आजवर कधीही न पाहिलेला जीवा–नंदिनी आणि काव्या–पार्थचा हटके अंदाज या शूटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

3 / 5
जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे जीवा–नंदिनी जणू थेट ऐंशीच्या दशकात रमले आहेत. रेट्रो स्टाइल पोशाख, जुन्या काळाचा रोमँटिक टच आणि त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे हा लूक सध्या विशेष चर्चेत आहे.

4 / 5
तर दुसरीकडे, काव्या–पार्थची जोडी पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसणार आहे. काऊबॉय लूक, हटके स्टाइलमुळे काव्या–पार्थचा हा अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

5 / 5
दोन वेगवेगळ्या शैली, दोन लोकप्रिय जोड्या आणि एकच भावना ती म्हणजे प्रेमाचा उत्सव. या खास प्री-वेडिंग शूटमुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील आगामी लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.