Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेला या गोष्टीची प्रचंड गरज होती; निधनाच्या कित्येक वर्षानंतर भावानेच सांगितले खरं
Laxmikant Berde: प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या...

मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेता म्हणून कायम लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव घेतले जाते. त्यांनी मराठी सिनेमांना सुवर्णकाळ दाखवला. त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये येण्यास भाग पाडले होते. पण या स्टारने अगदी कमी वयात जगाचा निरोप घेतला. आता त्यांच्या भावाने पुरुषोत्तम बेर्डे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
पुरुषोत्तम बेर्डे यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये भावाविषयी अनेक खुलासे केले आहेत. लक्ष्मीकांत यांना कोणत्या गोष्टीची गरज होती याबाबत सांगितले आहे.
लक्ष्मीकांत जेव्हा सुपरस्टार झाला तेव्हा त्याची जीवनशैली फारच धावपळीची झाली होती. खरंतर या सगळ्यामध्ये त्याला अध्यात्माची गरज होती. पण मला त्याला ते सांगता येत नव्हते असे पुरुषोत्तम म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, धावपळीच्या क्षेत्रात अध्यात्म खूप महत्त्वाचे आहे. अशोक सराफ हे प्रचंड प्रोफेशनल आहेत. पण निवेदिता त्यांच्या या गोष्टींची काळजी घेते. लक्ष्मीकांतने मात्र कधीच कोणाचं ऐकलं नाही. तो बायकोचंही ऐकत नव्हता. स्वत:चे निर्णय तो स्वत:च घेत असे.
लक्ष्या हा खूप डॉमिनेटिंग होता. तो कोणाचंच ऐकायचा नाही. मी त्याला शेवटपर्यंत सांगू शकलो नाही की तू या गोष्टींपासून लांब रहा... त्याने स्वतःला संपवलं असे देखील पुरुषोत्तम शेवटी म्हणाले.