ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा!

हळद ही आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. हळदीमधील कर्क्युमिन नावाचे पोषक तत्व त्वचेचा रंग वाढवण्यास मदत करते. आठवड्यातून एकदा गुलाब पाण्यात हळद मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठ्यांवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल आपल्या ओठांसाठी खूप फायदेशीर आहे.

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 12:08 PM
1 / 5
हळद ही आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. हळदीमधील कर्क्युमिन नावाचे पोषक तत्व त्वचेचा रंग वाढवण्यास मदत करते. आठवड्यातून एकदा गुलाब पाण्यात हळद मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठ्यांवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल.

हळद ही आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. हळदीमधील कर्क्युमिन नावाचे पोषक तत्व त्वचेचा रंग वाढवण्यास मदत करते. आठवड्यातून एकदा गुलाब पाण्यात हळद मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठ्यांवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल.

2 / 5

खोबरेल तेल आपल्या ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो, तसेच कोरडेपणाही संपतो. दिवसातून दोन ते तीन वेळा ओठांवर तेल लावा.

3 / 5

डाळिंबामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात. डाळिंबाच्या रसात गुलाबपाणी मिसळून ओठांवर मसाज करा.

4 / 5

कोरफड त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. दिवसातून दोन-तीन वेळा कोरफडचे जेल ओठांवर लावा. यामुळे ओठ्यांवरील काळेपणा दूर होईल.

5 / 5

लिंबू हे नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मांनी समृद्ध आहे. लिंबू त्वचेची टॅनिंग काढून टाकण्यास मदत करते. मध आणि लिंबू मिक्स करून ओठ्यांवर लावा. यामुळे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us