‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने कल्याणमध्ये सुरू केलं हॉटेल; स्वत: बनवते रुचकर जेवण

Madhavi Nimkar's Hotel: मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी यापूर्वी हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात प्रवेश केला आहे. आता या यादीत माधवी निमकरचंही नाव जोडलं गेलं आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 7:59 PM
1 / 5
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर हिने अभिनयासोबतच आता व्यवसायक्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. कल्याण पश्चिम इथं तिने 'कल्याणमस्तू' नावाचं स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. या नव्या व्यवसायाची माहिती माधवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली होती.

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर हिने अभिनयासोबतच आता व्यवसायक्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. कल्याण पश्चिम इथं तिने 'कल्याणमस्तू' नावाचं स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. या नव्या व्यवसायाची माहिती माधवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली होती.

2 / 5

माधवी निमकर ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या ती 'तुझ्या सोबतीने' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

3 / 5

अभिनयक्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर माधवीने आता व्यवसायाची नवी वाट निवडली आहे. कल्याण पश्चिममध्ये 'कल्याणमस्तु' हे तिचं नवं हॉटेल उभं राहिलं आहे. 'स्वाद आणि आशीर्वाद' अशी या हॉटेलची टॅगलाइन आहे.

4 / 5

या हॉटेलच्या मेन्यूची झलकही सोशल मीडियावर पहायला मिळाली असून मराठमोळ्या चवीला महत्त्व देण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे कल्याण परिसरातील खवय्यांसाठी हे नवं ठिकाण आकर्षणाचं केंद्र ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शूटिंगमधून वेळ काढून माधवी हॉटेलमध्ये आवर्जून मदत करते.

5 / 5

माधवीने तिच्या हॉटेलमध्ये स्वत: पोळ्या बनवल्या आहेत. या हॉटेलमध्ये खवय्यांना साबुदाणा खिचडी, वरण-भात, पोळ्या, पुरळपोणी, उकडीचे मोदक, उपवासाची थाळी, पारंपरिक भाज्या, शिरा असे पदार्थ चाखायला मिळतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us