भर मंचवर माधुरी दिक्षीतने सांगितली रेणूका शहाणे यांची ‘ती’ सवय, एकदा सुरु झाली की…
मराठीतील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा आणि सुंदर हास्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावणार आहेत. आधीचा एक किस्सा सोशल मिडीयावर तुफान व्हारयरल होत आहे.

माधुरीने रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांचं उत्साहात स्वागत केलं. यावेळी रेणुकाने गंमतीत माधुरीची नक्कलही केली. त्यामुळे कार्यक्रमात हसतखेळत वातावरण पाहायला मिळालं.
हॉटसीटवर बसल्यानंतर माधुरीने रेणुकाच्या हसण्याबद्दल खास टिप्पणी केली. ती म्हणाली, "रेणुका एकदा हसायला लागली की मग बघायला नको... थांबवणं खूप मुश्कील." यावर रेणुकानेही हसत सहमती दर्शवली.
माधुरी आणि रेणुका यांनी ‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात रेणुकाने माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातही माधुरी आणि रेणुका एकत्र दिसल्या होत्या. हा माधुरीचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यांच्या पुन्हा एकत्र येण्यामुळे चाहत्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
‘हम आपके है कौन’नंतर तब्बल 23 वर्षांनी माधुरी, रेणुका आणि प्रिया बेर्डे एकत्र आल्या आहेत. त्यामुळे या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तिघींच्या गप्पा आणि मजेशीर क्षण पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.