साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई; नम्रता शिरोडकरने शेअर केले फोटो, कोण आहे हाइन किम?

साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. पत्नी नम्रता शिरोडकरने या सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील कोरियन तरुणीला पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.

| Updated on: Jul 15, 2026 | 9:39 AM
1 / 5
साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा भाचा सिद्धार्थ गल्लाची लगीनघाई सुरू आहे. तेलुगू कुटुंबातल्या सिद्धार्थने साऊथ कोरियन गर्लफ्रेंड हाइन किम हिच्याशी साखरपुडा केला आहे. या साखरपुडा सोहळ्याचे फोटो महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा भाचा सिद्धार्थ गल्लाची लगीनघाई सुरू आहे. तेलुगू कुटुंबातल्या सिद्धार्थने साऊथ कोरियन गर्लफ्रेंड हाइन किम हिच्याशी साखरपुडा केला आहे. या साखरपुडा सोहळ्याचे फोटो महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2 / 5

सिद्धार्थचे वडील गल्ला जयदेव हे प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी राजकारणी आहेत. तर त्याची आई पद्मावती या महेश बाबूच्या बहीण आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि हाइन यांनी इटलीमध्ये हा साखरपुडा केला आहे. यावेळी महेश बाबूंच्या सूनबाईचा भारतीय पोशाखातील लूक पाहून नेटकरी प्रभावित झाले आहेत.

3 / 5

महेश बाबू यांच्या कुटुंबात कोरियन सूनबाईचं आगमन होणार आहे. या फोटोंमध्ये हाइन पिवळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसून येत आहे. भारतीय महिलेप्रमाणेच तिने हा पोशाख केला आहे. महेश बाबू यांची होणारी सूनबाई आहे तरी कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

4 / 5

हाइन किमच्या व्यवसायाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, फक्त ती सेवा क्षेत्रात कार्यरत असल्याचं समजतंय. हाइनच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या आईवडिलांसोबतच्या तिच्या प्रेमळ नात्याची झलक मिळते. जुलै 2025 मध्ये तिने कुटुंबीयांसोबत सिंगापूरमधल्या सहलीचा आनंद लुटला होता.

5 / 5

हाइनला प्रवासाची प्रचंड आवड असून तिने जगभरातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये सॅन फ्रान्सिस्को, सिंगापूर, इटली, कॅलिफोर्निया, थायलँड, जपान आणि इंडोनेशिया यांसारख्या शहरांचा आणि देशांचा समावेश आहे. भारतातही तिने हैदराबाद आणि गोवा या शहरांना भेट दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us