Solapur Fire : सोलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग, एकामागून एक स्फोट!

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीमधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. या आग लागलेल्या ठिकाणी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Updated on: Oct 03, 2025 | 5:29 PM
1 / 5
सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या या कंपनीचे नाव तुळजाई असोशिएट असे आहे.  ही एक केमिकल कंपनी आहे. त्यामुळे ही आग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 / 5
ही आग लागल्यानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत आहेत. त्यामुळे कंपनीच्या आत नेमकं काय घडतंय, याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाहीये. या कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

4 / 5
या कंपनीला आग लागल्यानंत इतर कामगारांना सुरक्षित ठिकाणी लहवण्यात आले आहे. सोबतच लोकांना आग लागलेल्या कंपनीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

5 / 5
आगीची घटना समजताच अग्निशामक दलाला सूचना देण्यात आलेली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. केमीकलच्या कंपनीला आग लागलेली असल्याने आग कधीपर्यंत आटोक्यात येणार, असे विचारले जात आहे.