Malaika Arora : बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही, तरीही कोट्यवधींची मालकीण, मलायका कशी कमावते कोट्यवधींचा माया
अभिनेत्री मलायका आरोरा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. अशाच तिच्या संपत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री आलिशान आयुष्य जगते. जाणून घ्या मलाकया कशी कमावते कोट्यवधींचा माया...

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर आणि उद्योजिका ममलायका अरोरा हिची ची एकूण संपत्ती अंदाजे 100 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तर, इतर मार्गांनी अभिनेत्री कोट्यवधी रुपये कमावते.
टेलीविजन आणि रिअॅलिटी शो, फॅशन रिअॅलिटी शोमध्ये जजची भूमिका पार पाडत मलायका मोठी कमाई करते. एका एपिसोडसाठी ती लाखो रुपये मानधन घेते. एवढंच नाही तर, ब्रँड एंडोर्समेंट्स अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती आणि प्रमोशनमधून ती कोटींची कमाई करते.
सिनेमांमधील आयटम सॉन्ग्स किंवा आयकॉनिक गाण्यासाठी ती मोठी रक्कम चार्ज करते. तिचं स्वतःचं 'दिवा योगा' आणि फिटनेस युनिट्स आहेत. ती फॅशन ब्रँड 'द लेबल लाइफ' ची सह-संस्थापक, स्टाईल एडिटर आहे.
मलायका हिचं रेस्टॉरंट क्षेत्रातही व्यावसायिक सहभाग आणि गुंतवणूक आहे. मलायकाकडे मुंबईतील वांद्रे येथे कोट्यवधी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट आहे आणि तिच्याकडे रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, ऑडी यांसारख्या महागड्या आणि लक्झरी कारचे कलेक्शन आहे.
मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठी कमाई करते. सोशल मीडियावर मलायका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.