34 डिग्री सेल्सियसवर पारा… डोक्याला मुंडासे, बाजे ठाण, मनोज जरांगे यांचं शेतशिवारात रणरणत्या उन्हात उपोषण

Manoj Jarange Patil on Hunger Strike: मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. रणरणत्या उन्हात त्यांचं उपोषण सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत. काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

| Updated on: May 30, 2026 | 11:44 AM
1 / 6
Manoj Jarange Patil on Hunger Strike: मनोज जरांगे पाटील यांनी रणरणत्या उन्हात अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी कोणताही मंडप नाही.  शेतशिवारात मोकळ्या बाजेवर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे यांच्या भेटायला आलेले आहेत.

2 / 6
जालना जिल्ह्यात आज उष्णतेचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.  कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. सकाळी हवेतील आर्द्रता (Humidity) सुमारे 60 टक्के, दिवसभरात त्यात घट होणार. दुपारच्या सत्रात उष्ण आणि कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे

3 / 6
मराठा आरक्षणाच्या काही मागण्यांसाठी मनोज जरांगे हे पुन्हा मैदानात उतरले आहे. अंतरवाली सराटीकडे आता मराठा बांधव यायला सुरूवात झाली. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी डोक्याला भगव्या रंगाचा रुमाल गुंडाळला आहे. पण या रणरणत्या उन्हात ते खाटेवर बसून आहेत. उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे.

4 / 6
उपोषणाला बसण्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यात आले. जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असल्याने त्यांचे समर्थक काळजीत सापडले आहेत. जरांगे यांनी पहिल्यांदाच असे विना मंडप आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणामुळे राज्यात काळजीचे वातावरण आहे.

5 / 6
या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सावलीत बसून आंदोलन करावे अशी विनंती सर्वच जण त्यांना करत आहेत. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

6 / 6
दुपारून उन्ह वाढणार आहे. मला उन्ह लागलं तरी चटके सरकारला बसणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. अभ्यासक बोलावले आहे. सरकारच्या ड्राफ्टवर चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय कळवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे जरांगे पाटील हे उन्हात उपोषणाला बसणार असल्याचे समोर येत आहे.

Follow Us