
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळलखीची गरज नाही. चाहत्यांमध्ये कायम सई हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. पण आता तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर कायम तिच्या बोल्ड आणि क्लासी लूकमुळे चर्चेत असते. दिवाळीसाठी अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री हटके लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

फोटोंमध्ये सई हिने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावर सिल्व्हर रंगाचे दागिने घातले आहे... मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'फेस्टिव्हिटीज' असं कॅप्शन दिलं आहे, अभिनेत्रीने कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देस असते.

सई ताम्हणकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.