मराठमोळ्या सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस लूकवर थांबल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. ग्लॅमरस ड्रेसमध्ये सई हिने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सई हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सई आता कोणत्या सिनेमा, सीरिजमुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सईन ग्लॅमरस ड्रेसवर फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. वयाच्या 39 व्या वर्षी देखील सई चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सईच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सई हिने फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये 'तिला माहितीये...', असं लिहिलं आहे. सईच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांना सईचा लूक प्रचंड आवडलेला आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळलखीची गरज नाही. चाहत्यांमध्ये कायम सई हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. पण आता तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सई कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.