Urmila Kanetkar : एक अपूर्ण प्रेम कहाणी… उर्मिला कानेटकरने शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष

Urmila Kanetkar: मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच उर्मिलाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता ही पोस्ट काय आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 22, 2026 | 11:28 AM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिचे नाव बदलल्याचे पोस्टद्वारे सांगितले. आता तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिचे नाव बदलल्याचे पोस्टद्वारे सांगितले. आता तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2 / 5

उर्मिला कानेटकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ती सध्या काय करते या सिनेमातील सीनची एक क्लिप शेअर केली आहे. या सीनमध्ये अनुरागचं शाळेत असताना प्रेम असलेली तन्वी घरी येते. ती त्याच्या मुलीला नाव विचारते आणि ते ऐकून थक्क होते.

3 / 5

उर्मिलाने ती सध्या काय करते या सिनेमातील हा सीन शेअर केला आहे. त्यावर एक अपूर्ण प्रेम काहीणी आणि हा कधीही न विसरता येणारा सीन.. असे कॅप्शन रिल बनवणाऱ्याने दिले आहे. सोशल मीडियावर उर्मिलाच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

4 / 5

दुसऱ्या स्टोरीमध्ये उर्मिलाने सतिश राजवाडे यांना एक मेसेज टॅग केला आहे. हा तुझा आतापर्यंतचा सर्वात उत्तम आणि काय लक्षात राहणारा अभिनय आहे. तुझे हावभाव, तुझा अभिनय उत्कृष्ट आहे. तसेच तो सिनेमातील भूमिकेला योग्य न्याय मिळवून देतो असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

5 / 5

सध्या सगळीकडे उर्मिला कानेटकरची चर्चा सुरु आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या आहेत. उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. तसेच आता उर्मिलाने सोशल मीडियावरील तिचे नाव बदलून उर्मिला कानेटकर केल्याचे समोर आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us