वर्षा उसगांवकर यांचा चक्क मेट्रोमध्ये रॅम्प वॉक; प्रवाशांनी मोबाइल हाती घेतला अन्..

मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्यांनी अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता तर चक्क मेट्रोमध्ये वर्षा उसगांवकर प्रवाशांना दिसल्या.

| Updated on: Feb 24, 2026 | 3:51 PM
1 / 5
मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. आज सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींच्या रोजच्या आयुष्याबद्दल कळतं. पण अनेक चाहत्यांना तर वर्षा उसगांवकर  मेट्रोमध्ये दिसल्या.

मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. आज सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींच्या रोजच्या आयुष्याबद्दल कळतं. पण अनेक चाहत्यांना तर वर्षा उसगांवकर मेट्रोमध्ये दिसल्या.

2 / 5

वर्षा उसगांवकर दिसताना प्रवाशांनी मोबाईल हाती घेतला आणि फोटो, व्हिडीओ काढू लागले. तर वर्षा उसगांवकर यांनी मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला. वर्षा उसगांवकर यांच्यासोबत अन्य मुलींनी देखील मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला.

3 / 5

सांगायचं झालंतर, नागपुरात चालत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शोलो प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचीही हजेरी होती. शोमध्ये नवोदित डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान करून मॉडेल्सनी मेट्रोच्या डब्यात रॅम्प वॉक केला.

4 / 5

या फॅशन शो मध्ये 8 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. शोमध्ये सहभागी असलेल्यांनी खास लूक करत वॉक केलं आणि प्रवाशांनी देखील सर्वांना उत्तम प्रतिसाद दिला. सध्या शोचे फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5

विविध फॅशन इन्स्टिट्यूट मधील नवोदित मॉडेलनी चालत्या ट्रेनमध्ये केलेला रॅम्पवॉक पाहून प्रवासी देखील थक्क झाले. सेलिब्रेशन ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत महामेट्रो शुल्क आकारून अशा कार्यक्रमाना परवानगी देत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us