चौघुले जरा इकडे या… भर विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाज दिला अन्…

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच या शोमधील हास्यवीर समीर चौघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 19, 2025 | 1:24 PM
1 / 5
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी शो म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहिला जातो. संपूर्ण महाराष्ट्राला या शोने अक्षरश: वेड लावले आहे. अनेकजण ट्रेनमधून प्रवास करताना, जेवताना, बऱ्याच वेळा या शोचे एपिसोड बघताना दिसतात. या शोमधील प्रत्येक विनोदवीराने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर केले आहे. नुकताच समीर चौघुले यांनी एक किस्सा सांगितला आहे.

2 / 5
समीर चौघुलने यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानातील भेटीचा किस्सा सांगितला आहे. आता नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया...

3 / 5
समीर चौघुलने नुकताच सोनी मराठीच्या MHJ Unplugged मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. 'मी एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विमानात भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले चौघुले जरा इकडे या... हे बघा..' असे समीर चौघुले म्हणाला.

4 / 5
'मला वाटलं आता मला दाखवणार हे? तर त्यांनी मोबाईलची स्क्रीन माझ्याकडे वळवळी. त्यांच्या टाइमलाइनवर असलेला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो दाखवला. ते म्हणाले हे बघा, माझी टाइमलाइन दिसतेय का तुम्हाला... सगळे हास्यजत्राचेच एपिसोड आहेत. आम्ही फक्त तुमचेच एपिसोड बघत असतो' असे समीर चौघुले म्हणाला.

5 / 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 2018 साली सुरु झाला आहे. या शोमध्ये कलाकार हे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो.