Matka King Review : जुगाराच्या बादशाहची कथा, कशी आहे नागराज मंजुळेंची ‘मटका किंग’ सीरिज?

Matka King Review : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिज कशी आहे, ते जाणून घ्या.. आठ एपिसोड्सची ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये विजय वर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.

| Updated on: Apr 17, 2026 | 12:08 PM
1 / 5
'मटका किंग' ही नवीन वेब सीरिज नुकतीच प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. आठ एपिसोड्सच्या या सीरिजची कथा खऱ्या घटनांवर आधारित आहे. यामध्ये अभिनेता विजय वर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. ही कथा जुगाराचा बादशाह आणि चित्रपट निर्माता रतन खत्रीच्या जीवनावर आधारित आहे.

2 / 5
'मटका किंग'मध्ये 1960 च्या दशकातील मुंबईचं चित्रण करण्यात आलं आहे. महत्त्वाकांक्षा, सत्ता, नातेसंबंध आणि व्यवस्था यांना सीरिजमध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे. या सीरिजची सुरुवात दमदार असली तरी कथा जसजशी पुढे सरकते, तशी त्याची पकड कमकुवत होऊ लागते.

3 / 5
काही ठिकाणी कथा इतक्या धीम्या गतीने पुढे जाते की तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून बघावंसं वाटतं. त्यामुळे आठ एपिसोड्सच्या जागी सहा एपिसोड्समध्येही कथा दाखवली जाऊ शकली असती. या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ जुगारापुरती मर्यादित नाही. यात क्रिकेट, राजकारण, मनोरंजन, गिरणी कामगार आणि गुन्हेगारी विश्व यांच्याशी संबंधित कथाही पहायला मिळते.

4 / 5
हे संपूर्ण जाळं उघडकीस आणू पाहणाऱ्या एका शोधपत्रकाराचा मागोवादेखील ही सीरिज घेते. 'मटका किंग' पाहताना अनेकदा 'स्कॅम 1992'ची आठवण येते. बॅकग्राऊंड म्युझिकच्या बाबतीत मात्र 'मटका किंग' तेवढी प्रभावी ठरत नाही. या सीरिजमध्ये गुलशन ग्रोवरने दमदार काम केलं आहे.

5 / 5
जर तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्सची सीरिज पसंत असेल तर 'मटका किंग' कदाचित निराश करू शकते. वीकेंडला टाइमपाससाठी काही नवीन पहायची इच्छा असेल तर ही सीरिज नक्की पाहू शकता. ही वन टाइम वॉच सीरिज आहे. निर्माते या सीरिजचा दुसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

Follow Us