मीरा भाईंदरमध्ये भर रस्त्यावर चक्क झोंबी? व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ!

मीरा-भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका तरुणाने हे घातक ड्रग्स घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

| Updated on: Apr 15, 2026 | 3:54 PM
1 / 5
मीरा-भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  एका तरुणाने हे घातक ड्रग्स घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. रात्रीच्या सुमारास तो भर रस्त्यात विचित्र अवस्थेत आढळून आला.

मीरा-भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका तरुणाने हे घातक ड्रग्स घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. रात्रीच्या सुमारास तो भर रस्त्यात विचित्र अवस्थेत आढळून आला.

2 / 5

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण ड्रग्सच्या नशेत स्वतःवरचा ताबा गमावून अनियंत्रित हालचाली करत होता.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

3 / 5

हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याबाहेर सुरू असलेले ड्रग्स रॅकेट आता मुंबईलगतच्या परिसरात पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4 / 5

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5

तर दुसरीकडे मीरा भाईंदर परिसरात अशा प्रकारे ड्रग्सचा शरकाव झाला असेल तर ड्रग्स तस्करांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी सामान्यांकडून केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us