Manushi Chhilar : निळाशार सागर, बिकिनीमध्ये मादक अदा, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या मालदीवमधल्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Manushi Chhillar : मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. शहरातल्या धकाधकीच्या जीवनपासून चार क्षण निवांत घालवण्यासाठी ती मालदीवला गेली आहे. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मिस वर्ल्ड 2017 आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर आपल्या लूक्समुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आहे. मानुषी छिल्लर मालदीवला गेली आहे. तिथून तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाढत्या गरमीपासून सुटका करुन घेण्यासाठी मानुषी छिल्लर मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचली. मानुषीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटोज शेअर केलेत. यात ती मालदीवच्या बीचवर एन्जॉय करताना दिसतेय.

मानुषी छिल्लरने या फोटोजमध्ये पिवळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. हा तिला लूक अनेकांना आवडलय. तिने 'बेटावरची मुलगी' असं फोटोजना कॅप्शन दिलं आहे. पिवळ्या रंगाच्या मोनोकिनी सोबत मानुषी छिल्लरने सनग्लासेस कॅरी केला आहे.

बिकिनीशिवाय मानुषीने ब्रालेट स्टाइल टॉपला लूज पॅन्टसह कॅजुअल लूकमध्ये पोज दिली आहे. त्यावर तिने गोल्ड ज्वेलरी आणि हलक नॅचुरल मेकअप केलाय.

या फोटोंमध्ये मानुषीने ग्लॅमरस अदा दाखवल्या आहेत. मानुषी छिल्लर एका फोटोत बेबी ब्लू बिकिनी घालून सुद्धा आहे. मानुषीने मालदीवमधून आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी घायाळ करुन सोडलं आहे.