फुल एवढं सुंदर की दिसताच प्रेमात पडाल, पण घरात आणलं की होतो गंभीर आजार; नाव काय?

या जगात काही फुलं ही खूपच सुंदर आणि सुगंधी असतात. परंतु काही फुलं ही सुंदर दिसत असली तर ती खूपच विषारी असतात. त्यामुळे चुकूनही या फुलाचे झाड घरी लावू नये.

| Updated on: Mar 01, 2026 | 4:01 PM
1 / 5
फुल प्रत्येकालाच आवडतं. आपल्या घरापुढच्या अंगणात फुलांची भरपूर झाडं असावीत असं लोकांना वाटतं. त्यासाठी अनेकजण खूप मेहनतही घेतात. काही लोक तर बागेतच वेगवेगळ्या प्रजातीची फुलं लावतात. बागकाम करताना काही लोक या फुलझाडांचा जीवापाट सांभाळ करतात.

फुल प्रत्येकालाच आवडतं. आपल्या घरापुढच्या अंगणात फुलांची भरपूर झाडं असावीत असं लोकांना वाटतं. त्यासाठी अनेकजण खूप मेहनतही घेतात. काही लोक तर बागेतच वेगवेगळ्या प्रजातीची फुलं लावतात. बागकाम करताना काही लोक या फुलझाडांचा जीवापाट सांभाळ करतात.

2 / 5

आपल्याला काही फुलांचा रंग आवडतो. तर काही फुलांचा सुगंध खूपच छान असतो. काही फुलं एवढी आकर्षक असतात की ते आजूबाजूला असले की ताजेतवानं वाटतं. म्हणूनच अनेकजण फुलांची झाडं लावतात.

3 / 5

परंतु काही फुलं दिसायला चांगली असली तरीही ती कधीही तुमच्या आजूबाजूला नसली पाहिजेत. ही फुलं खूपच विषारी असू शकतात. आयरीस हे फुलदेखील असंच विषारी असतं. हे फुलझाड लावताना विचार करूनच लावायला हवे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

4 / 5

आयरीस फुलझाडाला गार्डन प्लांन्टदेखील म्हटलं जातं. हे फुल माणसांच्या किंवा प्राण्यांच्या संपर्कात आलं की त्याचे दुष्परीणाम दिसायला लागतात. या फलझाडाची मुळं किंवा पानं माणसाच्या संपर्कात आले की त्वचेला खाज यायला लागते.

5 / 5

त्यामुळेच हे झाड बागेत, घरात लावायचे असेल तर योग्य काळजी घ्यायला हवी. हँडग्लोज घालून किंवा या झाडाचा त्वचेशी संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यायला वही. (टीप- या स्टोरीतील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. त्यामुळे कोणताही प्रयोग करण्याआधी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us