
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली नेहमीच चर्चेचा विषय असते. अंबानी कुटुंब हे केवळ महागड्या ब्रँड्सवर नाही, तर पाण्याच्या शुद्धतेवर आणि गुणवत्तेवर लाखो रुपये खर्च करते. त्यांच्या आरोग्याचे खरे गुपित आता समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते अंबानी कुटुंब त्यांच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने नॅचरल मिनरल वॉटर (Natural Mineral Water) आणि अल्कलाईन वॉटर (Alkaline Water) यांवर भर देते. तज्ज्ञांच्या मते, ते केवळ एकाच विशिष्ट ब्रँडवर अवलंबून नसून, पाण्याच्या गुणवत्तेला प्राधान्य देतात.

अनेक बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि अंबानींच्या खाजगी कार्यक्रमांतील ते Aava या ब्रँडचे पाणी वापरताना दिसतात. हे पाणी अरवली पर्वतरांगांमधील नैसर्गिक स्त्रोतांमधून येते. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सिलिका यांसारखी नैसर्गिक खनिजे असतात.

या पाण्यावर कोणतीही कृत्रिम प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे त्याची नैसर्गिक चव आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंबानींसारखे श्रीमंत व्यक्ती शरीरातील pH लेव्हल संतुलित राखण्यासाठी अल्कलाईन पाण्याचा वापर करतात.

हे पाणी शरीरातील ॲसिडिटी कमी करते आणि मेटाबॉलिझम (Metabolism) सुधारण्यास मदत करते. विशेष म्हणजे अँटिलियामध्ये प्रगत वॉटर आयनायझर्स बसवण्यात आले आहेत, जे सामान्य पाण्याचे रूपांतर हायड्रोजनयुक्त अल्कलाईन पाण्यात करतात.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर एखादे कुटुंब उच्च दर्जाचे नॅचरल मिनरल वॉटर वापरत असेल, तर त्यांचा मासिक खर्च 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकतो, जो त्यांच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत अत्यंत क्षुल्लक आहे.

तसेच अंबानी कुटुंब उच्च दर्जाचे नॅचरल मिनरल वॉटर आणि अल्कलाईन फिल्टरेशन सिस्टीम वापरत असतील तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा पाण्याच्या देखभालीचा आणि शुद्धतेचा खर्च वार्षिक 30 ते 35 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंबानींसारख्या व्यक्तींसाठी पाण्याचा खर्च हा त्यांच्या आरोग्यातील गुंतवणूक असतो. शुद्ध पाणी केवळ तहान भागवत नाही, तर शरीराचे रक्षण करून प्रतिकारशक्ती टिकवून ठेवते.

बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, अंबानी कुटुंबाकडून वापरल्या जाणाऱ्या आवा (Aava) नॅचरल मिनरल वॉटरच्या एका बाटलीची किंमत त्याचे कोणत्या स्वरूपात पॅकेजिंग आहे यावर अवलंबून असते. या पाण्याच्या ७५० मिलीच्या काचेच्या (Premium Glass Bottle) एका बाटलीची किंमत साधारणपणे 1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आहे.

तर, त्यांच्या प्लास्टिक बाटल्यांचे दर प्रति नग 439 पासून 15000 रुपयांपर्यंत आहेत. अंबानी कुटुंब प्रामुख्याने ज्या नॅचरल अल्कलाईन श्रेणीतील पाण्याचा वापर करते, त्याचा प्रति लिटर खर्च साधारण अत्यंत उच्च श्रेणीत मोडतो. (डिस्कलेमर: सदर माहिती विविध मीडिया रिपोर्ट्स आणि सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. अंबानी कुटुंबाने याबाबत किंवा विशिष्ट ब्रँडच्या वापराबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.)