Jio IPO : ग्रे मार्केटमध्ये 22 टक्के प्रीमियमची चर्चा; जिओच्या IPO मधून किती फायदा होण्याचा अंदाज?

जिओच्या IPO कडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं असून, ग्रे मार्केटमध्येही मोठी हालचाल दिसत आहे. अर्ज करण्यापूर्वी किंमत, संभाव्य लिस्टिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित आकड्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

| Updated on: Oct 20, 2026 | 6:16 PM
1 / 5
जिओ IPO 21 ऑक्टोबरला खुला होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या या IPO मधून 30,213 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट असून, 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

जिओ IPO 21 ऑक्टोबरला खुला होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या या IPO मधून 30,213 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट असून, 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

2 / 5

IPO ची किंमत 1,065 ते 1,119 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी एका लॉटमध्ये 12 शेअर्स असून, वरच्या किंमतीनुसार किमान 13,428 रुपये गुंतवावे लागतील.

3 / 5

अँकर गुंतवणूकदारांकडून IPO ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 19 ऑक्टोबरला अँकर गुंतवणूकदारांसाठी खुल्या झालेल्या या IPO मध्ये 8,110 कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांच्या बोली आल्या.

4 / 5

ग्रे मार्केटमध्ये IPO चा प्रीमियम 22 टक्क्यांच्या आसपास आहे. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास प्रीमियम 22 टक्के नोंदवण्यात आला. मात्र, ग्रे मार्केटमधील हा अंदाज असून प्रत्यक्ष लिस्टिंगची किंमत वेगळी असू शकते.

5 / 5

28 ऑक्टोबरला शेअर बाजारात लिस्टिंग होण्याचे नियोजन आहे. IPO चे शेअर्स 26 ऑक्टोबरला अलॉट होण्याची अपेक्षा असून, 27 ऑक्टोबरला रिफंड आणि शेअर्स क्रेडिटची प्रक्रिया होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us