Multibagger Stock: या छोटुरामची धमाल, कर्जमुक्त होणार, गुंतवणूकदार मालामाल
Penny Stock: या छोटुराम शेअरने मोठी धमाल उडवून दिली आहे. ही कंपनी लवकरच कर्जमुक्त होणार आहे. गुंतवणूकदार मालामाल होणार आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 13 टक्क्यांनी वधारला. हा शेअर दहा रुपयांच्या आत आहे. कंपनी कर्जमुक्त होणार असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

PC Jeweller Share मध्ये बुधवारी मोठी उसळी आली. हा एक पेनी स्टॉक आहे. बुधवारी BSE च्या इंट्राडेच्या दरम्यान 13 टक्क्यांहून अधिक उसळला. हा शेअर 9.65 रुपयांवर पोहचला. मार्च 2026 च्या तिमाहीत कंपनीने जोरदार व्यवसाय केला.

पीसी ज्वेलर कंपनी सातत्याने कर्ज कमी करत आहे. कंपनीनुसार, ती लवकरच कर्ज मुक्त होईल. 30 मार्च 2026 रोजीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 27 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरमध्ये 52 आठवड्यातील उच्चांक 19.65 रुपये आहे. तर पीसी ज्वेलरच्या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांकी स्तर 7.45 रुपये आहे.

ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर लिमिटेडने लवकरच कर्ज मुक्त होणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने बँकांचे जवळपास 23 टक्के कर्ज परत केले आहे. कंपनी सातत्याने बॅलेन्स शीट मजबूत करण्याच्या तयारीत आहे. त्याचा गुंतवणूकदारांनाही फायदा झाला आहे.

या कंपनीचा वार्षिक आधारावर 32 टक्के महसूल वाढला. कंपनीसाठी आर्थिक वर्ष 2026 अत्यंत चांगले राहिले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीच्या महसूलात मोठी वाढ दिसून आली. कंपनीने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत एक करारही केला आहे.

कंपनीने यापूर्वी गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे गिफ्टही दिले आहे. तर सध्या हा शेअर दहा रुपयांच्या आत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे या कंपनीकडे लक्ष आहे. कंपनी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर पुढे जात असताना कंपनी नवीन उपक्रमावरही भर देत आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.