Multibagger Stock: 5 वर्षात 1297 टक्के रिटर्न… किंमत म्हणाल तर अजूनही 50 रुपयांच्या आत… कोणता आहे हा मल्टिबॅगर शेअर?
Multibagger Stock: या स्टॉकने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरने 1297 टक्के रिटर्न दिला आहे. विशेष म्हणजे हा स्टॉक आताही 50 रुपयांच्या आत आहे. गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी आहे.

मल्टिबॅगर स्टॉक तिरुपती फोर्जचा शेअर मंगळवारी 5 टक्क्यांनी वधारला. स्मॉल कॅप स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागले. अप्पर सर्किटमुळे हा शेअर 43.20 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला. या कंपनीचे मार्केट कॅप 547 कोटी रुपये इतके आहे.

जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान कंपनीचा एकूण महसूल 43.03 कोटी रुपये इतका होता. एकाच वर्षापूर्वी समान तिमाहीत कंपनीचा महसूल 49.25 कोटी रुपये इतका होता. तिरुपती फोर्जच्या निव्वळ नफ्यात 1.52 कोटींची घसरण झाली आहे. एक वर्षापूर्वी समान तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 2.02 इतका होता.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा महसूल 165.94 रुपये इतका होता. आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा महसूल 116.29 कोटी रुपये होता. PAT वार्षिक आधारावर घसरत आहे. कर कपातीनंतर कंपनीचा नफा 6.29 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीला 7.86 कोटींचा नफा झाला.

2026 मध्ये Tirupati forge च्या शेअरची किंमत 24 टक्क्यांनी वाढली. एका वर्षात या स्टॉकने 11.93 टक्क्यांनी परतावा दिला आहे. कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 52 रुपये आणि 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 43.17 रुपये आहे.

तिरुपती फोर्जने 2021 मध्ये बोनस शेअर दिला होता. तेव्हा कंपनीने 4 शेअरवर 3 बोनस शेअर दिले होते. 2021 मध्ये कंपनीचा शेअर विभाजीत झाला होता. तेव्हा कंपनीचा शेअर 5 हिश्यात विभाजीत झाला होता. गेल्या तीन वर्षांत या शेअरने 359 टक्क्यांची तेजी दिसून आली.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.