Mulund Metro Slab Collapse: मुंबई हादरली! मेट्रोचा सिमेंटचा मोठा पिलर धडाम कोसळला, रिक्षा आणि कारचा चक्काचूर; एकच खळबळ

Mulund Metro Slab Collapse: मुलूंडमध्ये मेट्रोचे काम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळा आहे. हा स्लॅब एका कार आणि रिक्षावर कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

| Updated on: Feb 14, 2026 | 1:43 PM
1 / 5
मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका व्यक्तीसह दोन वहाने दबल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

2 / 5
मुलुंडच्या फायर बिग्रेड जवळ ही घटना घडली. रस्त्यावर कोसळलेला स्लॅब हटवून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. हा स्लॅब एका चार चाकी वाहनावर आणि रिक्षावर पडल्याचे समोर आले आहे.

3 / 5
या दुर्घटनेमुळे मुलूंड येथील हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.  या आधी देखील मेट्रो प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच हा स्लॅब कोसळला आहे.

4 / 5
मेट्रो पुलाचा काही भाग कोसळला आहे. हा स्लॅब कोसळ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्लॅब एका चार चाकी गाडीवर आणि रिक्षावर कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

5 / 5
मुलूंड येथील मेट्रो दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का? किंवा दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यावर प्रशासन काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.