ताशी 320 किमी वेग, विमानासारख्या सुविधा अन्… देशातील पहिल्या बुलेट ट्रेन कोणत्या रंगाची? फर्स्ट लूक पाहून डोळे दिपतील

भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ पासून मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. ताशी ३२० किमी वेग असलेल्या या भगव्या रंगाच्या ट्रेनमुळे ६ तासांचा प्रवास अवघ्या २ तासांत पूर्ण होईल.

| Updated on: May 21, 2026 | 11:44 AM
1 / 6
भारताच्या हाय-स्पीड रेल्वेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन येत्या १५ ऑगस्ट २०२७ पासून रुळांवर धावेल, अशी अधिकृत घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. आता नुकतंच बुलेट ट्रेनचा पहिला लूक समोर आला आहे.

भारताच्या हाय-स्पीड रेल्वेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन येत्या १५ ऑगस्ट २०२७ पासून रुळांवर धावेल, अशी अधिकृत घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. आता नुकतंच बुलेट ट्रेनचा पहिला लूक समोर आला आहे.

2 / 6

सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सध्या रेल्वेने ६ ते ७ तास लागतात. मात्र, बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास केवळ २ तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार असून दोन आर्थिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.

3 / 6

या ट्रेनचा सुरुवातीचा वेग ताशी ३०० किमीपेक्षा जास्त असेल, तर कमाल वेग ताशी ३२० किलोमीटर पर्यंत जाईल. ही भारतातील आजवरची सर्वात वेगवान ट्रेन ठरेल. 'नमो भारत' ट्रेनच्या धर्तीवर या बुलेट ट्रेनला आधुनिक भारतीय ओळख देण्यात आली आहे.

4 / 6

आता नुकतंच बुलेट ट्रेनचा फर्स्ट लूक व्हायरल होत आहे. यात मुंबई-अहमदाबाद धावण्यास सज्ज होत असलेली बुलेट ट्रेन भगव्या रंगात पाहायला मिळत आहे. याद्वारे ती भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवताना दिसत आहे.

5 / 6

सुरुवातीला या बुलेट ट्रेनला ८ डबे (Coaches) असतील, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून भविष्यात ही संख्या वाढवली जाईल. या ट्रेनमध्ये आरामदायी आसने, प्रगत सुरक्षा प्रणाली आणि विमानात मिळतात तशा जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळतील.

6 / 6

जपानच्या अत्याधुनिक हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाच्या (Shinkansen) मदतीने हा प्रकल्प साकारला जात आहे. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणातील हा टप्पा देशातील व्यवसाय, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना देईल. या प्रकल्पासोबतच भारतचा जगातील मोजक्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क असलेल्या देशांच्या पंक्तीतही समावेश होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us